वाघोली – आव्हाळवाडी येथील लोकनियुक्त सरपंच ललिता चंद्रकांत आव्हाळे यांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल आव्हाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुणे जिल्हा पदाधिकारी व प्रशासकीय प्रमुखांच्या हस्ते आव्हाळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आव्हाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सचिव गणेश कुटे, माजी सरपंच चंद्रकांत आव्हाळे, नीलकंठेश्वर पतसंस्थेच्या संचालिका कविता कुटे,प्राची कुटे, श्रुती कुटे, यांच्या हस्ते निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
Covid-19 यांच्या वाढत्या प्रादुर्भाव च्या काळात संपूर्ण गावासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ विविध सामाजिक संस्था यांना सोबत घेऊन केलेल्या कार्याची दखल पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आली आहे.
गावातील विविध लोकोपयोगी कामामुळे वेगळा आदर्श उभा राहिला आहे. लोकनियुक्त महिला सरपंच आव्हाळे यांना सन्मानित करण्यात आल्याने महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे नीलकंठेश्वर पतसंस्थेच्या संचालिका कविता कुटे यांनी सांगितले.