मुंबई – अभिनेत्री सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या बोल्ड आणि हॉट लुकमुळे ती अधिक ओळखली जाते. तिच्या ‘केनेडी’ चित्रपटातील भूमिकेचे देखील कौतुक करण्यात आले. यासाठी ती पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर झळकली होती. या चित्रपटाच्या यशानंतर आता सनी आगामी प्रोजेक्टच्या तयारी लागली आहे. याची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
नुकतेच सनी लिओनीने इंस्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. यात ती स्क्रीप्ट वाचत असल्याचे दिसते. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ती एक मोठी स्क्रिप्ट आहे. खूप छान होणार!!!!!” यावरून ती लवकरच एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे समजते. ज्यामुळे चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
View this post on Instagram
केनेडीमधील चार्लीची सनी लिओनीची भूमिका समीक्षकांना आवडली, मात्र हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याची अनेकजण वाट पाहत आहेत. केनेडी व्यतिरिक्त तिच्याकडे अनेक प्रकल्प आहेत, ज्याद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र सनीचा हा आगामी प्रोजेक्ट नेमका कोणता असणार आहे? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, यावर्षी सनी लिओनी पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर झळकली होती. यावेळी ती खूप आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तिचे ‘केनेडी’ चित्रपटातील भूमिकेचे देखील कौतुक करण्यात आले. यानंतर सनीने तिचा पती डॅनियलचे आभार मानत त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती. ‘मला पुढे जाण्यासाठी आणि माझी स्वप्न साकार करण्यासाठी तू केलेली लढाई ही एका वेगळ्या स्तरावर नि:स्वार्थीपणाची आहे,’ असे तिने पोस्टमध्ये लिहिले होते.