Shivani Surve : अभिनेत्री शिवानी सुर्वेने (Shivani Surve) मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. याशिवाय ती काही चित्रपटांमध्येही झळकली आहे. सध्या तिचा ‘झिम्मा 2′ चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता शिवानी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवानीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातून तिने लग्न करणार असल्याची हिंट दिल्याचे म्हंटले जात आहे
शिवानीची बॉयफ्रेंड अभिनेता अजिंक्य ननवरेसोबत (Shivani Surve) अनेकदा चर्चा रंगलेली दिसते. दोघांचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवानीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती साड्यांच्या दुकानातून असून वेगवेगळ्या साड्या ड्रेप करुन पाहत आहेत. सोबतच ती याचं व्हिडिओ शूटही घेत आहे. हा व्हिडिओ शेअर करत’ आईला या आठवड्यात पाठवलेले व्हिडिओ. 2024 मध्ये काहीतरी विशेष.’ असं कॅप्शन तिने दिलं आहे.
View this post on Instagram
यावरूनच नेटकऱ्यांना ती येत्या नव्या वर्षात लग्न करणार आहे का? असा प्रश्न पडला आहे. ‘लगीनघाई’, ‘तू आणि अजिंक्य लग्न करत आहात’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. मात्र अद्याप याबाबत शिवानीने कोणताही खुलासा केलेला नाही . मात्र तिने शेअर केलेल्या व्हिडिओ चाहते विचारात पडले आहेत. शिवानीच्या या व्हिडिओवर अजिंक्यही हसला आहे. तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि ऋतुजा बागवेने व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, ‘तू जीवाला गुंतवावे’या मालिकेमुळं माझी आणि अजिंक्यची भेट झाली. 2015 पासून ते एकमेकांना डेट करत आहे. सुरुवातीला दोघांच्या ही नात्याला घरांच्यानी विरोध केला होता. मात्र चार वर्षांनी कुटुंबियांनी आमच्या नात्याला परवानगी दिल्याचे शिवानीने एका मुलाखतीत सांगितले होते.