मुंबई – कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा सत्य प्रेम की कथा हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. म्हणूनच कियारा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठीक ठिकाणी हजेरी लावताना दिसली. यावेळी कियाराने सिम्पल पण काहीतरी हटके करण्यासाठी गुलाबी साडी परिधान केली होती.साडीमध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. मात्र चांगली साडी आणि हॉट लूक असूनही चाहत्यांना तिची एक गोष्ट खटकली आणि त्यांनी तिला सोशल मीडियावर सुनावलं.
यावेळी कियाराने साडीतील आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये कियाराने गुलाबी रंगाच्या साडीवर डिझायनर व्हाइट कलरचा ब्लाउज कॅरी केला आहे. यासह त्याला साजेल असे कानातील झुमके यावेळी तिने घातले आहेत. अभिनेत्रीने हलका मेक-अप देखील केला आहे आणि हाय हिल्स परिधान केल्या आहेत. मात्र फोटोमध्ये एक विचित्र गोष्ट फॅन्सच्या नजरेत आली आणि अनेकांना ती खटकली.
फोटोंमध्ये कियाराच्यासाडीचा पदर उडताना दिसत आहे. अभिनेत्रीची ही देसी बोल्ड स्टाईल अनेक चाहत्यांना आवडली. तर काही नेटकऱ्यांना ही बाब खटकली देखील आणि यावरूनच अनेकजण कमेंटमध्ये आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले.
‘प्रिटी पिंक’ अशी कमेंट एकाने केली आहे तर त्यावरच दुसऱ्या एकाने ‘संस्कृती खराब करू नको.. पदर सांभाळ’ असं म्हणत कियाराला सुनावले आहे. साडी सांभाळता येत नसेल तर कशाला घालावी अशी देखिल एकाने कमेंट केली आहे. तर त्यावर फॅन्सने उत्तर देत ही स्टायलिश साडी आहे असं म्हंटल आहे. अशा अनेक कमेंट या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
समीर विद्वांस दिग्दर्शित ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी रिलीज करण्यात आली असून, ती रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.