मुंबई – आज महाराष्ट्र दिन जल्लोषात साजरा होत आहे. अशात कलाविश्वासह राजकीय वर्तुळातून देखील महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशात अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
अग्निहोत्र,कश्याला उद्याची बात’ आणि “जिवलगा’ यासारख्या गाजलेल्या मालिकांद्वारे सिद्धार्थ चांदेकरने हे नाव घराघरात पोहचले. मालिकांनंतर सिद्धार्थाने अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये झेंडा,झिम्मा अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा महाराष्ट्र दिन यानिमित्त सिद्धार्थाने मराठी अभिमान बाळगून एक पोस्ट शेअर केली आहे.
सिद्धार्थ आपल्या पोस्टमध्ये लिहितो,”जगातले सगळे पेहराव एका बाजूला आणि झब्बा सलवार, डोक्यावर फेटा आणि कपाळावर टिळा एका बाजूला. मराठी दिसणं, मराठी बोलणं आणि मराठी जगणं याहून दुसरं सुख नाही, दुसरा अभिमान नाही. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.जय महाराष्ट्र” यासह सिद्धार्थने पारंपरिक वेषभूषेसह फेटा घातलेला एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. सिद्धार्थ नेहमीच सोशल मिडीआयवर सक्रिय असतो आणि आपल्या पोस्टद्वारे विविध विषयांवर भाष्य करत असतो. सिद्धार्थ लवकरच झिम्मा २ मध्ये दिसणार आहे. पहिल्या झिम्माला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.