गैरव्यवहारातील दोषींवर कारवाईची मागणी

तालिका अध्यक्ष आ. शंभूराज देसाईंचे शासनाला निर्देश

कराड -पाटण तालुक्‍यातील तारळे येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेच्या शाखेत शाखेचा शाखाप्रमुख याने या विभागातील एका राजकीय पुढाऱ्याला हाताशी धरून शाखेत कर्जवाटपात तसेच अनेक बाबतीत आर्थिक गैरव्यवहार केले असल्याने शाखेतून या विभागातील स्थानिकांना कर्जवाटप करणे थांबविण्यात आले असल्याची बाब निदर्शनास आली असून शाखाप्रमुख व राजकीय पुढारी या दोन व्यक्तींच्यामुळे स्थानिक उद्योजक, व्यापारी तसेच नागरिक हे वेठीस धरले जात असल्याने या बॅंकेच्या शाखेतील सर्व गैरव्यवहाराची जिल्हाधिकारी यांचेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषींवर कडक कार्यवाही करून बॅंकेतून कर्जपुरवठा सुरळीत सुरू करावा, असे निर्देश तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंनी शासनाला दिले आहेत.

तारळे, ता. पाटण येथे बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेची शाखा असून या शाखेमध्ये शाखेचा संबंधित शाखाधिकारी याने तारळे विभागातील एका राजकीय पुढाऱ्याला हाताशी धरून बॅंकेच्या शाखेत कर्जवाटपामध्ये तसेच इतरही आर्थिक बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असल्याचे उघडपणे या विभागातील स्थानिक उद्योजक, व्यापारी तसेच नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.