– हिमांशू
आपल्याला अंधाराची भीती वाटते तशीच अज्ञाताचीही भीती वाटते. पण अज्ञाताबद्दल एक प्रकारचं कुतूहलही आपल्या मनात असतं. अन्आयडेन्टिङ्गाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट, अर्थात यूएङ्गओ हा असाच एक कुतूहलाचा विषय. परग्रहावर माणसासारख्या जीवांची वस्ती असावी का? असेलच तर ते लोक कसे असतील? आपल्यापेक्षा ते प्रगत असतील का? त्यांनाही आपल्याबद्दल असंच कुतूहल असेल का? तेही आपला शोध घेत असतील का? ते आपल्यासमोर आले तर संघर्ष होईल का? झालाच तर ते आपल्यापेक्षा प्रबळ ठरतील का? असे असंख्य प्रश्न आपल्या मनात वर्षानुवर्षे आहेत. या विषयाचा अभ्यास करणारे तज्ज्ञही जगभरात आहेत.
यूएङ्गओबद्दल यापूर्वी ऐकलेल्या कहाण्या खर्या की खोट्या हे आपल्याला अद्याप ठाऊक नाही. अमेरिकेला परग्रहावरच्या लोकांच्या स्पेस शिपचे काही अवशेष सापडले असून, त्यावर संशोधन सुरू आहे, असं आपण वारंवार ऐकतो. पेंटागॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयाकडून वारंवार त्याचा इन्कार करण्यात आलाय. पण हे म्हणणं काहींना पटलेलं नाही. वेगवेगळ्या सायन्स ङ्गिक्शनमधून परग्रहावरच्या कथित मानवसदृश जीवांचा उल्लेख येतो; पण त्याबद्दल पुरावे नाहीत, असं खात्रीलायकपणे सांगितलं जातं. अमेरिकेच्या हाती काही एलियन्स लागले असून, त्यावर गुप्तपणे संशोधन सुरू आहे, असा दावा तीन माजी लष्करी अधिकार्यांनी केला होता. त्यावर याच वर्षी जुलै महिन्यात अमेरिकेच्या संसदेत चर्चाही झाली होती.
हा विषय अमेरिकेत सध्या पुन्हा ऐरणीवर आलाय आणि यावेळी त्याचं कारण आहे खुद्द अमेरिकेच्या अध्यक्षांच्याच विमानाच्या आसपास दिसलेली गूढ उडती वस्तू. अध्यक्ष बायडन एअर ङ्गोर्स वनच्या विशेष विमानातून लॉस एंजेलिसकडे प्रवास करीत असताना त्या विमानाच्या आसपास एक चमकती वस्तू घिरट्या घालताना दिसल्याचा दावा केला गेला. या दृश्याचा व्हिडिओही तयार करण्यात आला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. लॉस एंजेलिस विमानतळाच्या परिसरात राहणार्या दोन भावांनी हे दृश्य कॅमेर्यात टिपल्याचं सांगितलं जातंय. पेंटागॉन किंवा अन्य कोणत्याही अमेरिकी सुरक्षा यंत्रणेकडून याबद्दल अद्याप काही सांगितलं गेलेलं नाही.
एकंदर दोन व्हिडिओ व्हायरल झाले असून, एकात ही गूढ वस्तू विमानाच्या जवळून वेगाने जाताना दिसतेय तर दुसर्या व्हिडिओत ती विमानावर घिरट्या घालताना दिसतेय. अर्थात, यावरून लगेच ठोस निष्कर्ष काढण्याजोगी परिस्थिती नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांवर पाळत ठेवली जात असू शकते, असंही काहींचं म्हणणं आहे. खुद्द चित्रण करणार्या भावांपैकी एकाने असं म्हटलंय की, ही कथित वस्तू विमानापासून दूर राहावी, असा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी करायला हवा होता.
यूएङ्गओचे किस्से 1940 च्या दशकापासूनच चर्चिले जात आहेत. या कथित उडत्या तबकड्यांविषयी किंवा त्यांच्या अवशेषांविषयी ठोस पुरावे दिले जात नसले तरी अशा वस्तू पाहिल्याचं असंख्य लोकांनी सांगितलंय. ते हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी सोडलेले बलून असावेत, इथपासून हेरगिरीपर्यंत अनेक शक्यता व्यक्त केल्या गेल्यात. मानवसदृश परंतु उंचीला कमी असणारे दोन सांगाडे मेक्सिकोच्या संसदेत यापूर्वी सादर करण्यात आल्यानंतर एलियन्सचं गूढ आणखी वाढलंय. प्रश्न अनेक आहेत आणि संपूर्ण जग उत्तरांच्या प्रतीक्षेत आहे.