नगर – तांभेरे परिसरात एका अल्पवयीन तरुणीचे दोन तरुणांनी सिनेस्टाईलने अपहरण करून तिला मोटारसायकलवर बसवून पळवून नेले. दरम्यान, तरुणीच्या नातेवाईकांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी धूम ठोकली. त्यानंतर निर्मळ पिंपरी येथे जाऊन तरुणीला ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्पवयीन तरुणी ही अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तरुणी तिच्या घराजवळ असलेल्या चौकात उभी होती. त्यावेळी एका मोटार सायकलवर दोन अनोळखी तरुण तेथे आले. त्यांनी तरुणीला त्यांच्या मोटारसायकलवर बसवून पळवून नेले. वडिलांनी व इतर नातेवाईकांनी त्यांचा पाठलाग केला.
तेव्हा ते भरधाव वेगात निघून गेले. एका नातेवाईकांनी तुमची मुलगी निर्मळ पिंपरी (ता. राहाता) येथील बायपास चौकात दोन तरुणासोबत मोटरसायकलवर जाताना मिळून आली. वडील तत्काळ निर्मळ पिंपरी येथे गेले. त्या ठिकाणी दोन तरुणांसह ती तरुणी मिळून आली.
लोणी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणीला तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले. वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात येऊन आरोपी गौरव विश्वनाथ लबडे (रा. शिंदे वस्ती, कोल्हार बु.) व अमोल संतोष बेलकर (रा. बेलकर वस्ती, तांभेरे, ता. राहुरी) या दोघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.