पुणे – मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मंगळवारी सायंकाळी आरती करण्यात आली. यावेळी सर्व मंडळांचे पदाधिकारी आणि विश्वस्त उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने यांसह विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी आणि प्रशांत टिकार, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती मंडळाचे प्रवीण परदेशी, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे नितीन पंडित, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, जान्हवी धारिवाल-बालन, श्री जिलब्या मारुती गणपती मंडळाचे भूषण पंड्या यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.