राहुरी – पोलवर टाकलेला आकडा काढून घे, असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघां जणांना लाथाबुक्क्यांनी लोखंडी गज, लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना पिंपरी अवघड येथे घडली.
भागुबाई गंगाधर बाचकर यांनी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अर्जुन लहानू बाचकर हा भागुबाई बाचकर यांच्या घरासमोर आला होता. तेव्हा बाचकर यांचे दीर लिंबाजी बाचकर हे त्यास म्हणाले की, तू विहिरी शेजारील पोलवर टाकलेला आकडा काढून घे. काल माझ्या भावजयला शॉक बसला होता. शिविगाळ दमदाटी केली. त्यावेळी इतर आरोपी तेथे आले. त्यांनीही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी भागूबाई बाचकर, त्यांचा मुलगा संकेत व दीर लिंबाजी बाचकर या तिघांना आरोपींनी लाथा बुक्क्यांनी व लोखंडी गज, लाकडी दांड्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. भांडणामध्ये भागूबाई बाचकर यांच्या गळ्यातील पोत व लिंबाजी बाचकर यांचा मोबाईल गहाळ झाला.
घटनेनंतर भागूबाई बाचकर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अर्जुन लहानू बाचकर, अमोल अर्जुन बाचकर, गणेश अर्जुन बाचकर, भारत त्रिबंक बाचकर (सर्व रा. पिंपरी अवघड, ता. राहुरी) या चार जणांवर शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला