बीजिंग – चीनच्या शांकशी प्रांतात तैयुआन शहरानजिक उभारण्यात आलेल्या एका थिमपार्क पर्यटन स्थळाला लागलेल्या आगीत तेरा जण होरपळून मरण पावले तर अन्य पंधरा जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे.
चीनमध्ये सध्या आठ दिवसांची राष्ट्रीय सुट्टी सुरू झाली आहे. त्याच्या पहिल्या दिवशीच गुरुवारी ही घटना घडली. हे थिमपार्क बर्फाच्या कलाकृतींविषयी प्रसिद्ध आहे.
चीनच्या या नॅशनल हॉलिडेच्या काळात ठिकठिकाणी अनेक पर्यटन उत्सव आयोजित करण्यात येत असतात. त्यासाठी विदेशांतूनही अनेक पर्यटक येत असतात.
ज्या ठिकाणी आगीची घटना घडली आहे त्या ठिकाणीही पर्यटकांसाठी अनेक आकर्षणे असल्याने तिथेही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, पण ही आग वेळीच आटोक्यात आणली गेल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.