पुण्याच्या भोर तालुक्यातील ब्राम्हणघर गावातील शेतकरी सदाशिव कुमकर यांनी पोटच्या पोरा प्रमाणे सांभाळलेल्या गाईची, घरातील सदस्याप्रमाणे अंत्ययात्रा काढली. लाडानी वाढवलेली गाय गेल्यावर तिच्या अंगावर वस्त्र टाकून, तिची बैलगाडीतून अंत्ययात्रा काढून, शेतकऱ्यानी कृतज्ञता दाखवली. बैलगाडीच्या पुढे भजन म्हणत गावातील ग्रामस्थही अंत्ययात्रामध्ये सहभागी झाले होते. कुमकर कुटुंबीयांनी डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंच्या धारानि, आपल्या लाडक्या गायीला अखेरचा निरोप दिला. शेतकऱ्याचं हे गाईवरच प्रेम पाहून, गावातील नागरिक देखील भारावून गेले होते.