Actor Pushkar Jog : काही दिवसांपूर्वीच मराठी बिग बॅास विजेता शिव ठाकरे याच्या मुंबईतील घरी शार्टसक्रिटमुळे आग लागली होती. सुदैवाने अग्निशमल दल वेळेत घटनास्थळी पोहल्याने पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. आगीच्या घटनेत अभिनेत्याचे घराचे मोठे नुकसान झाले असून घर जळून खाक झाले आहे. त्याने याबाबत हळहळ व्यक्त केली आहे. अभिनेता पुष्कर जोगच्या फ्लॅटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पुष्कर आणि त्याच्या कुटुंबातील कोणालाही दुखापत झालेली नाही. संपूर्ण कुटुंब सुखरुप आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याचे दिसत आहे. घरातील सगळ्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. पुष्कर जोग हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे. जबरदस्त या मराठी चित्रपटातून त्याने चित्रपसृष्टीत पदार्पण केले. तो सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. त्याच्या कामाबाबत आणि खासगी आयुष्याबद्दलचे अनेक व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नेमकं काय घडलं? अभिनेत्याने नेमकं काय घडले होते. याबाबत सांगितले आहे. माझ्या बिल्डिंगमध्ये आग लागली आहे. मी अडकलो आहे. मला मदत करा. माझ्या मुलीसह मी घरातून बाहेर पडू शकत नाही. सगळीकडे आग लागली आहे. त्यांनंतर अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत त्याच्या इमारतीत पाणी मारल्याचे दिसत आहे. View this post on Instagram A post shared by Pushkar Jog (@jogpushkar) या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पुष्करने “रिअल लाइफ हिरो अग्निशामक दलाचे फायटर्स, बीएमसी आणि मुंबई पोलीस यांच्यामुळे जीव वाचला. माझं घर गेलं”, असे म्हटले आहे. पुष्करने या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. पुष्करने शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट करत सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, लवकरच तो ‘ह्युमन कोकाईन’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेही वाचा : बांगलादेशच्या राजकारणाचे ‘क्राऊन प्रिन्स’ तारिक रहमान नेमके कोण ? ; जाणून घ्या त्यांचे भारताबद्दल काय विचार आहे?