Bjp Leader : भाजपचा अनुभवी चेहरा हरपला; माजी खासदाराचं निधन
Bjp Leader : मध्य प्रदेश भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी राज्यसभा खासदार आणि माजी आमदार नारायण सिंह केसरी यांचे निधन झाले आहे.

Bjp Leader : मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार नारायण सिंह केसरी यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने भाजपसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. जनसंघाच्या काळापासून राजकारणात सक्रिय असलेले केसरी हे अनुभवी संघटक, माजी आमदार आणि प्रभावी वक्ते म्हणून ओळखले जात होते. (Bjp Leader)
जनसंघापासून भाजपपर्यंतचा राजकीय प्रवास
नारायण सिंह केसरी यांनी जनसंघाच्या काळापासून संघटनेसाठी काम केले. भाजपची स्थापना झाल्यानंतरही ते पक्षाशी जोडलेले राहिले. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आमदार आणि राज्यसभेचे खासदार म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. संघटनात्मक काम, जनसंपर्क आणि पक्षविस्तारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. (Bjp Leader)
अनुसूचित जाती समुदायात संघटनेच्या विस्तारासाठी योगदान
भाजपने जारी केलेल्या शोकसंदेशात केसरी यांच्या संघटनात्मक कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. अथक परिश्रम आणि देशभरातील व्यापक दौऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी मध्य प्रदेशासह विविध भागांतील अनुसूचित जाती समुदायामध्ये संघटनेचा विस्तार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, असे पक्षाने म्हटले आहे. (Bjp Leader)
संघर्ष, दृढनिश्चय आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या केसरी यांच्या निधनामुळे पक्षाने एक अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना भाजपकडून व्यक्त करण्यात आली आहे. (Bjp Leader)
लाल सिंह आर्य यांच्याकडून श्रद्धांजली
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लाल सिंह आर्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नारायण सिंह केसरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. जनसंघ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रभावी वक्ते तसेच माजी आमदार आणि राज्यसभेचे माजी खासदार म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत आर्य यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. (Bjp Leader)
केसरी यांच्या निधनामुळे भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वातील एक अनुभवी चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थकांकडून शोक व्यक्त केला जात आहे. (Bjp Leader)
BJP Leader Pass Away : राजकीय वर्तुळात शोककळा ! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचे निधन





