Shiv Thackeray : बिग बॉस फेम शिव ठाकरे सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. बिग बॉसनंतर त्याने अनेक शोमध्ये सहभाग घेतला. सध्या तो छोट्या पडद्यावरील ‘झलक दिखला जा 11’ पाहायला मिळाला. लवकरच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. पण फिनालेच्या एक आठवडा आधीच शिव ठाकरे या शोमधून बाहेर पडला आहे.
फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी शिव ठाकरे आणि धनश्री वर्मामध्ये अंतिम स्पर्धा होती. यावेळी धनश्रीने डिप्रेशनवर आधारित परफॉर्मन्स दिला तर शिव ठाकरेंनी दमदार डान्स केला. यामध्ये धनश्रीचा विजय झाला तर शिव ठाकरे कमी गुण मिळाल्यामुळे बाद झाला. शिव ठाकरे याच्या बाहेर जाण्याने त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. त्यांनी निर्मात्यांवर टीका केली असून शिव विजेता होण्यास पात्र आहे, असे चाहत्यांचे मत आहे.
Honestly this was a biased and wrong eviction 💔
He actually deserved to be one of the finalist !Much luck and Best wishes for future @ShivThakare9 #ShivThakare#ManishaRani #ManishaSquadpic.twitter.com/oDp1SazXnj
— 𝘳𝘶𝘵𝘩𝘢𝘱𝘢𝘳𝘪𝘯𝘥𝘢 🕊️ (Vote for Manisha) (@ruthaparinda) February 24, 2024
अनेकांनी शिव ठाकरे मराठी असल्यामुळे त्यांना बाहेर पाठवल्याचा आरोप निर्मात्यांवर केला. वास्तविक, शेवटच्या क्षणी शिवसाठी कोरिओग्राफर बदलण्यात आला होता, ज्यामुळे त्याला आऊट होण्याचे परिणाम भोगावे लागले. शिवला बाहेर काढल्यावर फराह खान, मलायका अरोरा आणि अर्शद वारसी भावूक झाल्याचे दिसले. एका यूजरने लिहिले की, “हे खरंच खूप चुकीचं आहे, नेहमी मराठी माणसांवर अन्याय का होतो? दुसऱ्याने लिहिले, “मी या शोचा फिनाले पाहणार नाही. आता या शोवर बहिष्कार टाकला जाईल.”
शिव ठाकरेचे चाहते नाराज
‘झलक दिखला जा 11’मधून शिव ठाकरेच्या जाण्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कारण या शोमध्ये शिव ठाकरे शानदार डान्स करताना दिसला. मात्र, असे असतानाही फिनालेसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दरम्यान, ‘झलक दिखला जा 11’ चा फिनाले मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.