Pune: दडपशाहीच्या बंदोबस्तासाठी तुतारीला मतदान करा : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे

बिबवेवाडी – राज्यात महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा अनेक समस्या आहेत. बलात्कारांच्या घटना घडत आहेत. आया-बहिणी सुरक्षित ठेवण्यासाठी, बेरोजगार हातांना काम देण्यासाठी, महागाईचा दर कमी करण्यासाठी, गुंडशाही दडपशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी बुधवारी (दि. 20) तुतारी वाजवणारा माणूस चिन्हसमोरील बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांना विजयी करावे, असे आवाहन शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहन जोशी, अंकुश काकडे, बाळासाहेब ओसवाल, अशोक हरणावळ, स्वाती पोकळे, भगवानराव साळुंखे, किशोर कांबळे, राजाभाऊ कांबळे, राहुल तुपेरे, शैलेद्र नलावडे, शशिंकात तापकीर, सूरज लोखंडे, अमोल रासकर, सचिन देडे, संतोष पाटोळे, रमेश सोनकांबळे, गणेश मोहिते, सचिन जोगदंड, तुषार नांदे, ऋषिकेश भुजबळ, निलेश पवार, लखन वाघमारे, समीर पवार, सौरभ माने.
रोहित माळी, अमोल ननावरे, संजय दामोदरे, अमोल परदेशी, सद्दाम शेख, निलेश खंडाळे, स्वप्निल खडके, पिरदिप शिवशरण, सतीश पवार, पुष्कर अबनवे, बाळासाहेब अटल, भरत सुराणा, विजय हिंगे, सचिन पासळकर, अनिल सातपुते, रवी ननावरे, विद्या ताकवले, रुपाली बिबवे, मृनाली वाणी आदी महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अंधारे म्हणाल्या की, अडीच वर्षात 70 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा झाल्या, त्यामध्ये 65 परीक्षेत पेपर फुटी झाली. हे पेपर फोडणारे कोण ? सरकारी जागा भरण्याची भरती प्रक्रिया खासगी ठेकेदारांना देण्यात आली हे सर्व ठेकेदार देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित आहेत.
भाजप अदानी-अंबानी संबंध आहे, मग गरिबांसाठी कोण? यावेळीमहाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी मागील पंधरा वर्षातील आपल्या कामाचा आढावा मतदारांना सांगितला. सूत्रसंचालन स्वप्निल खडके यांनी केले. शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांनी आभार मानले.
दलित स्वयंसेवक संघटनेच्या पाठिंबामुळे रमेश बागवे यांना मंत्रीपद मिळाले होते. याच दलित स्वयंसेवक संघाने महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला. यावेळी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या नातू सचिन साठे, प्रशांत शिरसागर, श्रीकांत मेमाणे, नरेश बागुल, पराग थोरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





