नवी दिल्ली – काॅंग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर काही वेळातच प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी भाजपा राष्ट्रीय महासचिव सीटी रवि यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला आहे.
खुशबू सुंदर यांनी दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात भाजपाचे सदस्यत्व स्विकारले. आज (सोमवार) सकाळीच त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला होता.
अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी 2014 मध्ये काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काॅंग्रेसमध्ये येण्यापुर्वी खुशबू सुंदर डीएमके पक्षात होत्या.
अभिनेत्री खुशबू सुंदर म्हणाल्या की, “पक्षात असे काही वरिष्ठ आहेत ज्यांना समाजामध्ये कोणी ओळखत देखील नाही. ते त्यांचे म्हणणे लादतात आणि माझ्यासारख्या पक्षासाठी गांभीर्याने काम करू इच्छिणाऱ्याला मागे सारतात.”
दिल्ली: भारतीय जनता पार्टी में शामिल होने के बाद खुशबू सुंदर भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा से मिलीं। pic.twitter.com/qEq5K6P9Hw
— ANI_HindiNews (@AHindinews) October 12, 2020