इस्लामामबाद /नवी दिल्ली – पाक व्याप्त काश्मिरचे पंतप्रधान फारूक हैदर खान यांना नवाझ शरीफ यांच्या सांगण्यावरून पकिस्तान सरकारविरोधात कट रचल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. शरीफ यांनी ऑमलाईन भाषणात पाकिस्तानी लष्करावर टीका केली होती.
पाकिस्तान आणि लष्कराविरोधात कट रचल्याच्या आरोपावरून नवाझ शरीफ आणि खान यांच्यासह शरीफ यांच्या पक्षाच्या नेत्यांवर लाहोरमध्ये सोमवारी गुन्हा नोंदवण्यात आला होता. पक्षाच्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दलही मरीअम नवाझ, राणा सनाउल्लाह, अहसान इकबाल शाहीद खाक्वन
परवेझ रशीद आदी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लंडनमध्ये उपचार घेण्याऐवजी शरीफ तेथून पाकिस्तान आणि लष्कराच्या बदनामीचा कट आखत आहेत असे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.
20 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला केलेल्या भाषणातून पाकिस्तानला एफएटीएफच्या करड्या यादीत टाकण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना मदत झाली असल्याचे नमूद केले आहे.