बॉलीवूडमधील किंग खान अर्थात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही एक “आयलॅंड गर्ल’ आहे. तिने आपल्या सोशल मीडियावरील एका नवीन पोस्टच्या माध्यमातून हे सिद्ध करून दाखविले आहे. सुहानाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खडकावर बसलेली दिसून येत आहे.
यातील पहिल्या फोटोत ती स्लो मोशनमध्ये खडकावर बसलेली दिसते. तर दुसरा फोटो हा क्लोजअप शाट्स आहे, ज्यात ती खुपच हॉट असल्याचे दिसून येत आहे. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये “आयलॅंड गर्ल’ असे म्हटले आहे. हे फोटो कुठे काढण्यात आले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु ते अलीबाग येथील असल्याचे प्रेरित होते.
सध्या सोशल मीडियावर सुहानाचे हे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत. अनेक चाहत्यांना तिचा हा लुक खूपच आवडला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून तिला लाखोंच्या संख्येने लाइकस् केले जात आहे. दुसरीकडे चाहत्यांना ती चित्रपटसृष्टीत कधी पाउल ठेवणार याचीही उत्सुकता लागलेली आहे.