मंचर (पुणे) – मंचर शहरात करोनाबाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या “डॉक्टर आपल्या दारी’ या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे मंचर शहरात करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर आळा बसून मृत्युदर निश्चितच कमी होईल आणि करोनाबाधीत रुग्णांबरोबरच इतर आजारी रुग्णांवरही वेळेत उपचार होतील. मंचर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील माळवाडी परिसरातून कामास सुरुवात केली आहे.
अनेक नागरिक करोनाच्या भीतीमुळे सर्दी, ताप, खोकला आणि इतर आजार अंगावर काढत आहेतण ज्यावेळेस आजारी व्यक्ती अत्यवस्थ होते तेव्हाच तो रुग्ण उपचारासाठी बाहेर पडतो, त्यामुळे करोनाचा विळखा शरीराभर पसरतो. करोना होऊ नये, यासाठी प्रत्येकाने आपली वैद्यकीय तपासणी करावी, असे आवाहन यावेळी मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले. यावेळी मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, बाळासाहेब बाणखेले, साईनाथ पतसंस्थेचे संचालक युवराज बाणखेले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, माजी उपसरपंच धनेश मोरडे, मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले, माजी सदस्य अरुण बाणखेले, बाजीराव मोरडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रंगनाथ थोरात, भाजपचे संदीप बाणखेले, लक्ष्मण बाणखेले, सुशांत जाधव, महेश घोडके, आकाश मोरडे, बंटी मोरडे, बंटी क्षीरसागर, अक्षय चिखले, ऋषीकेश शेटे, जयेश भालेराव, शुभम गवळी, यश नांगरे आदी मान्यवर उपस्थित होते. मंचर शहरातील डॉ. राहुल पोखरकर हे प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून संबंधित रुग्णाची तपासणी करीत आहेत.