जयपूर – काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांचा आज जन्मदिवस. पायलट यांनी पक्षांतर्गत घुसमटीचे कारण देत बंड उभारल्याने ते मागील काळात चर्चेचा विषय ठरले होते. मात्र त्यांचं हे बंड आता शमलं असून ते राजस्थान काँग्रेसमध्ये सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान, पायलट यांच्या बंडाचे प्रमुख कारण मुख्यमंत्री अशोक गेहलोत ठरले होते. गेहलोत – पायलट यांच्या दरम्यानची कटुता शिगेस पोह्चल्यानेच पायलटांना बंडाचे अस्त्र उगारवे लागले होते. यानंतर गेहलोत यांनी पायलट यांच्यावर टीका करताना अत्यंत कठोर शब्द वापरल्याचं पाहायला मिळालं होत.
मात्र बंड शमल्यानंतर दोन्ही नेत्यांनी भेट घेत, ‘झालं गेलं विसरून जाऊयात’ अशी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होत.
अशातच आज सचिन पायलट यांच्या जन्मदिनानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन पायलटजी. तुम्हाला आनंद, चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो.” अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
Wishing you a very happy birthday @SachinPilot ji. May you be blessed with happiness, good health and a long life.
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) September 7, 2020
पायलट यांनी देखील मुख्यामंत्री गेहलोत यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत, “वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद अशोक गेहलोतजी” अशा शब्दांमध्ये आभार मानले आहेत.
दरम्यान, यानिमित्ताने राजस्थान काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमध्ये टोकाच्या कटुतेनंतर मनोमिलन घडून येत असल्याचं पाहून सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.