रेडा- स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 मध्ये इंदापूर नगरपरिषदेने देशपातळीवर 14 वा तर देशाच्या पश्चिम विभागात 7 वा क्रमांक मिळवत सलग तीनवेळा क्रमांक मिळवून विजयाची हॅटट्रिक केली आहे.
सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग ऍण्ड अर्बन अफिअर्सकडून ऑनलाइन घोषणा करण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेसमोर फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. स्वच्छ इंदापूर, सुंदर इंदापूर, हरित इंदापूर अशा घोषणा देत एकमेकांना पेढे भरविण्यात आले.
नगरपरिषदेला बक्षिस जाहीर झाल्यानंतर पुण्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांचा सन्मान केला. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी रामनिवास झंवर, कर्मचारी अल्ताफ पठाण उपस्थित होते.
स्वछ सर्वेक्षणअंतर्गत केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेतील सर्वेनुसार शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोला आहे. पश्चिम विभागात एकूण पाच राज्यांत नगरपरिषदेने सातवे स्थान मिळवले आहे. देशातील 1 लाख लोकसंख्येत सर्वोत्कृष्ट 100 शहारांमध्ये 7 वा क्रमांक मिळवला आहे. पाच राज्यांतील. स्वत:ची सर्वोकृष्ट टिकाऊक्षमता शहर म्हणून बहुमान मिळविला आहे. नगरपरिषदेस एकूण 5 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे.
राष्ट्रीय स्तरावर इंदापूरचे नावलौकिक होणे, ही इंदापूर शहरासह तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, लहान, मोठे उद्योजक, विद्यार्थी, सामजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. यासाठी सर्व नगरसेवक व सर्व कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे शहरवासियांच्या सहकार्याचा खरा विजय आहे. यापुढेही सर्वांनी मिळून शहराचे नांव उंचावेल, असे कार्य करू.
– अंकिता मुकुंद शहा, नगराध्यक्षा, इंदापूर