शिरूर -शिरूर शहरात एकाच दिवशी 13 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली असून, यात एक डंबेनाला येथील येथील व्यावसायिक व एक नामांकित डॉक्टर या दोघांचा समावेश आहे. लहान मुलांचाही समावेश आहे. एकाच दिवशी 13 करोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने शिरूर शहर पूर्णपणे हादरून गेले आहे. त्यामुळे शिरूर शहरात आता रुग्ण संख्या 27 झाली आहे.
शिरूर शहरातील कुंभार आळी येथील करोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेले सहा, तर एका नामांकित डॉक्टर व त्याचे नातेवाईक चार, डंबेनाला येथील 1, व हुडको वसाहतीतील करोनाबाधित 53 वर्षीय रुग्णाचा भाऊ, कामाठीपुरा येथील एक असे मिळून एका दिवशी 13 रुग्ण आढळले. शिरूर नगर परिषदेच्या वतीने या भागात जंतुनाशक एकाची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.शासनाने दिलेल्या इतर नियमांचे पालन करणे असे आवाहन शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी सांगितले.