नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची लडाख भेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामागचे नेमके कारण तातडीने समजू शकलेले नाही. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजनाथ हे लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या समवेत शुक्रवारी लडाख भेटीवर जाणार होते.
चिनी कुरापतींमुळे सध्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्यामुळे चीनला थेट संदेश देण्याच्या उद्देशातून राजनाथ भेटीलामहत्त्व प्राप्त झाले होते. आता ते लवकरच लडाख भेटीवर जातील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.