नवी दिल्ली: जगभरातील बहुतांश देशांमध्ये करोनाचे थैमान अद्याप कायम असून जगभरातील करोनाबाधितांची संख्या 79 लाखांहून अधिक झाली आहे. तर करोनामुळे आतापर्यंत चार लाख 33 हजार नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मागील 24 तासात जगभरात 54 हजार नवे करोनाबाधित आढळून आले आहेत.
त्याचबरोबर जगभरातील 40 लाख 36 हजार रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. केवळ 8 देशांमध्येच जगातील 60 टक्के कोरोनाबाधित आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 45 लाखांच्या घरात आहे.
भारत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात चौथ्या स्थानावर पोहचला आहे. भारतात कोरोनाचे 3 लाख 24 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर करोनामुळे 9 हजारापेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे.
करोनाचा सर्वाधिक फटका जगात अमेरिकेला बसला असून 21 लाख 46 हजार जणांना अमेरिकेत करोनाची लागण झाली आहे.
तर करोनामुळे 1 लाख,17 हजारापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 8 लाख 50 हजार करोनाबाधित आहेत तर 42 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 41 हजार लोकांचा ब्रिटनमध्ये मृत्यू झाला आहे. करोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,301 मृत्यू झाले आहेत.
अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु हे आठ देश असे आहेत ज्या देशांमध्ये करोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळे झाला आहे.