हॉलीवूड अभिनेत्री पामेला अँडरसन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. काही दिवसांपूर्वी तिने बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रावर निशाणा साधला होता. पण आता ती एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. ते म्हणजे, तिने चौथ्यांदा लग्नाची इच्छा व्यक्त केल्यामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.
न्यूयॉर्क टाइम्स मॅगझीनला नुकतीच पामेलाने मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबाबत काही प्रशन विचारण्यात आले होते. तेव्हा तिने चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पामेला म्हणाली, माझे तीन वेळा लग्न झाले आहे. पण अनेकांना असे वाटते की मी पाच वेळा लग्न केले आहे. असे का हे मला माहीत नाही.
माझे लग्न टॉमी लीशी झाल्यानंतर मी बॉब रिचीशी लग्न केले. त्यानंतर रिक सॅलमनसोबत मी लग्न केले. माझी तीनच लग्न झाली आहेत. मला माहीत आहेत तीन लग्नदेखील खूप आहेत. पण पाचपेक्षा तरी कमीच असल्याचे पामेला म्हणाली. त्यानंतर तिला पुन्हा लग्न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तिने त्यावर का नाही? आता फक्त एकदाच. आता फक्त एकदा मला लग्न करायचे आहे देवा, असे उत्तर तिने दिले.