पुणे- लॉकडाऊन काळात कोणतीही परवानगी नसताना ब्युटीपार्लर सुरू करणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. विनापरवानगी पार्लर सुरू केले म्हणून या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानसी बाळकृष्ण डोंगरा (35, रा. हार्मोनी सोसायटी, नॉर्थ अॅव्हेन्यू रोड, कल्याणीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या व कोविड 19 उपाय योजना 2020 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
. ब्युटी पार्लरचे व्यावसायीक ग्राहकांना फोन करून अपॉईंटमेंट घेऊन त्यांना सुविधा पुरवीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार येरवडा पोलिस ठाण्यात पेट्रोलिस करत असताना मानसी या एका महिलेचे फेसपॅक करत असल्याचे आढळून आले. युनिट 4 चे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, पोलिस हवालदार राजु मचे, रमेश राठोड, सागर घोरपडे यांनी ही कारवाई केली.