मुंबई : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी पुष्पहार अर्पण करुन मंत्रालयात आज अभिवादन केले. यावेळी सचिव अंशु सिन्हा, उपसचिव नितीन खेडकर, अवर सचिव महेश वाव्हळ यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यांनीही अभिवादन केले.
समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धी आणण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी श्रमप्रतिष्ठेबरोबरच कमावलेले धन समाजासाठी वापरण्याच्या क्रांतीकारक संकल्पना मांडल्या. त्यांनी मांडलेल्या या संकल्पना आजच्या ‘कोरोना’ संकटावर मात करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा बसवेश्वरांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.