परिंचे- करोना विषाणूचा प्रादुर्भाव गावातील ग्रामस्थांना होऊ नये, गावातही करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी परिंचे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीने संपूर्ण गावांमध्ये सोडियम हायपो क्लोराइडची फवारणी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली शेडगे, उपसरपंच सुप्रभा जाधव, माजी सरपंच समीर जाधव, सोपान राऊत, हिना नवले, ग्रामपंचायत सदस्य मोहन भोसले, विमल दुधाळ, सारिका राऊत, संगीता जाधव, धुराजी दुधाळ, अनिल जाधव, विमल दुधाळ, ग्रामसेवक शशांक सावंत, कर्मचारी भाऊसाहेब दुधाळ, हर्षल वाघोले यांच्या उपस्थितीत गावांमध्ये रस्ते, वाड्या येथे औषधांची फवारणी करण्यात आली. करोनाच्या नियंत्रणासाठी तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह, कृषी सहायक, आरोग्य सेवक, आशासेविका, पोलीस पाटील यांचे विशेष पथक तयार केले आहे. पथकातून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना घरातच थांबण्याबाबत क्वारंटाइनचे शिक्के मारलेले आहेत.
ग्रामपंचायतीतर्फे फ्लेक्स बोर्ड लावण्यात येऊन जनजागृती करण्यात येत असल्याचे सरपंच शेडगे यांनी सांगितले. बाजारपेठेचे गाव असून देखील शुकशुकाट जाणवत आहे. पोलीस बंदोबस्ताचे चोख काम हवालदार अविनाश निगडे व खोमणे, तलाठी प्रमोद झुरंगे, पोलीस पाटील अविनाश वाघोले बजावत आहेत. माहिती पत्रके वाटप करण्यात आली आहेत. दुकानात जादा गर्दी होऊ नये, यासाठी बाहेर 2 मीटर अंतरावर चौकोनी मार्किंग केलेले आहे, असे पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना जाधव यांनी सांगितले.