मनोज जरांगेंची बजरंग सोनवणेंनी घेतली भेट; म्हणाले “सर्व खासदारांना एकत्र घेऊन…”

Bajrang Sonwane And Manoj Jarang| मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. त्यांची तब्येत देखील खालावत आहे. यादरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. काल मध्यरात्री ते मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी पोहचले होते. तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलीयाआधी सोनवणे यांनी 5 जून रोजी मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. .
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना बजरंग सोनवणे म्हणाले की, “मराठा आरक्षण ही माझी जबाबदारी असून त्यासाठी मी राज्यपालांची भेट घेणार आहे, त्यांना मराठा आरक्षणाविषयी पत्र लिहिणार आहे. त्याशिवाय सर्व खासदारांना एकत्र घेऊन मंत्रिमहोदयांची भेट घेणार आहोत. मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा, “अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं सोनवणेंनी सांगितलं. Bajrang Sonwane And Manoj Jarang|
बजरंग सोनवणेंचे राज्यपालांना पत्र
यानंतर आता बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसाठी राज्यपालांना पत्रही लिहिले आहे. यात त्याने लिहिले की, “8 जून 2024 पासून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणास बसले आहेत. मागील पाच दिवसांपासून त्यांनी अन्न, पाणी त्याग केलेला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.”
प्रति,
महामहीम राज्यपाल महोदय,
राजभवन, महाराष्ट्र राज्य,
मुंबई यांना सदर पत्र ईमेल द्वारे पाठवण्यात आलेले आहे. pic.twitter.com/wLQYghK3uF— Bajrang Sonwane (@bajrangsonwane_) June 12, 2024
“मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी महाराष्ट्र राज्य शासनाची भूमिका उदासिनतेची दिसून येत आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने वेळीच दखल न घेतल्यास राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याप्रकरणी आपण स्वत: लक्ष घालून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारला सूचित करावे,” असे बजररंग सोनावणे यांनी पत्रात म्हंटले आहे. Bajrang Sonwane And Manoj Jarang|
तर दुसरीकडे आज मंत्री शंभूराज देसाईंचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सोडावे या संदर्भात शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. यातून आता काय तोडगा निघणार का? हे पहावे लागणार आहे.
हेही वाचा :
Odisha। जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडले





