तळेगाव ढमढेरे- सरकारी रुग्णालयांमध्ये नवजात बालकाचे जन्म प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची ग्रामपंचायत कार्यालयपासून तर न्यायालयापर्यंत होणारी हेळसांड आता थांबणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना सरकारी दवाखान्यांमध्ये सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक सहकारी रुग्णालयांकडे नेहमीच पाठ दाखवत असतात. मात्र, तळेगाव ढमढेरे येथील जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने नवीन उपक्रम राबवून नवजात बालकाचे जन्म प्रमाणपत्र तात्काळ बाळाच्या आई-वडिलांच्या हातात देण्याची सुविधा उपलब्ध केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त आहे. या उपक्रमाची सुरुवात केल्याबद्दल डॉ. प्रवीण शिंदे, जालिंदर मारणे, सीताराम कोकडे, रुपाली मोरे या गटाचे पुणे जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे.
- आम्ही जिल्ह्यात प्रथम शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हा उपक्रम राबवू शकलो. याचा आम्हाला आनंद आहे. भविष्यात नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
-डॉ. प्रवीण शिंदे, वैद्यकीय अधिकारी