गुवाहाटी : एनआरसीआसाम.एनआयसी.इन या वेबसाईटवरून सुधारीत नागरिकत्व तपशील नाहीसा झाल्याच्या घटनेनंतर एनआरसीच्या अधिकाऱ्याने इतक्या महत्वाच्या तपशील असणअरा पासवर्ड परत न केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला.
माजी एनआरसी अधिकाऱ्याविरूध्द गोपनियता कायद्याअंतर्गत पलटण बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याचे एनआरसीचे राज्य समन्वयक हितेश देवशर्मा यांनी सांगितले. गेल्यावर्षी 11 नोव्हेंबरला त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पासवर्ड दिला नव्हता. त्यामुळे गोपनियता कायद्याचा भंग झाल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
हा पासवर्ड देण्यासाठी एनआरसी कार्यालयाने त्यांना अनेक वेळा लेखी कळवले होते. त्या कंत्राटी कर्मचारी होत्या. त्यांनी 11 नोव्हेंबरला राजीनामा दिला होता. त्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याला पासवर्ड स्वत:जवळ ठेवता येत नाही. त्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.