महेंद्र भाडळे यांची माहिती ः रोडवरील वाहतूक कोंडी कमी होणार
वाघोली- वाघोलीमध्ये बायफ रोडवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता कल्याण मंगल कार्यालयासमोरून सिमेंट कॉंक्रिटीकरणाचा पर्यायी रस्ता बनवण्यात येत आहे. या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बायफ रोडवर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भाडळे यांनी दिली.
वाघोलीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून बायफ रोडवरील नागरिकांना ये-जा करताना अडचणी येत होत्या. ग्रामपंचायतीकडे पर्यायी रस्त्या करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. ग्रामपंचायत निधीमधून कल्याण मंगल कार्यालयपासून ग्रीन ग्रोज सोसायटीपर्यंत बायफ रोडकडे जाणारा पर्यायी रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण केले जात आहे. या रस्त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. हा रस्ता नागरिकांना सोयीस्कर ठरणार असल्याचे सुयोग लकी होम सोसायटीच्या सदस्य व नागरिकांनी सांगितले. या रस्त्याची नुकतीच पाहणी करून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी करून समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, या रस्त्याच्या निधीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी उपसरपंच समीर भाडळे, ग्रामपंचायत सदस्या पूजा भाडळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरवठा केला होता.