पुणे: ७०० वर्षे पुरातन श्रीनागेश्वर मंदिरात शनिवार १५ नोव्हेंबर रोजी दीपोत्सव होत आहे. श्रीनागेश्वर मंदिराचे पुनर्निर्माण अडीच वर्षांपूर्वीच पार पडले आणि नव्या दिमाखाने ते भाविकांसमोर आले.
पुण्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेतील हे मंदिर शनिवारी एक लक्ष दिव्यांनी उजळून निघाले आहे. एक लक्ष दिव्यांच्या सान्निध्यात या मंदिराचे प्राचीन वैभव अधिकच लखलखत आहे.
शनिवारी सायंकाळी ६ पासून हा दीपोत्सव सुरू झाले आहे. यात हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला आहे. पुण्याच्या वैभवशाली परंपरेतील या मंदिरातील दीपोत्सव डोळे भरून पाहण्यासाठी अनेक नागरिक आवर्जून उपस्थित राहिले आहेत.