चेन्नई- तमिळ चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार रजनीकांत हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त काही दिवसांपासून येत आहेत. या सर्व बातम्या आणि भाजप प्रवेशाच्या सर्व शक्यता रजनीकांत यांनी फेटाळल्या आहेत. तसे. भाजपने मला त्यांच्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिलेले नाही. परंतु काही माध्यमे आणि ठराविक लोक माझे भगवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप रजनीकांत यांनी केला.
दरम्यान, भाजपने जाहीर केले आहे की, आमच्या पक्षाने कधीही असा दावा केलेला नाही की, रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते पोन राधाकृष्णन आणि रजनीकांत यांची नुकतीच भेट झाली होती. त्यानंतर रजनीकांत यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या पसरू लागल्या. परंतु मला भाजपकडून पक्षात येण्याचे कोणतेही आमंत्रण नाही, असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले.
रजनीकांत म्हणाले की, मला भाजपच्या रंगात, भगव्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिरुवल्लुवर यांचेदेखील भगवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु तिरुवल्लुवरजी त्यामध्ये फसले नाहीत, त्याचप्रमाणे मीदेखील यात अडकणार नाही.