शॉपिंग फेस्टिव्हल, पतपुरवठ्यात सुधारणांसह विविध सवलतींचा पाऊस
नवी दिल्ली : निर्यातीला चालना, दुबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या धर्तीवर चार शहारात मेगा फेस्टीव्हल, लहान आणि परवडणऱ्या घरांसाठी 10 हजार कोटींची तरतूद, सर्व बंदरामवर मॅन्यूअल क्लिअरन्स अशा अनेक महत्वपूर्ण सवलतींची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला.
देशात आलेल्या मंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकार हालचाल करत नाही अशी टीका गेले काही दिवस होत आहे. या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. नियमित पतपुरवठ्यासंदर्भात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या प्रमुखांशी 19 सप्टेंबर रोजी चर्चा करण्यात येईल. महागाई नियंत्रणात असून महागाईचा दर 4 टक्क्यांपेक्षा कमी करण्यास यश आले आहे. गेल्या काही दिवसामत चलनवाढ नियंत्रणात आल्याचा दावा करून ही औद्योगिक उत्पादनाच्या पुनरूजीवनाची सुरवात असल्याचे त्यांनी सांगितले.
निर्यात आणि रिअल इस्टेटसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. लहान तसेच परवडणरी आणि मध्यम उत्पन्नांच्या रखडलेल्या गृहप्रकल्पांच्या पुर्तीसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे सांगून अर्थमंत्री म्हणाल्या, छोट्या करदात्यांना दिलासा देताना छोट्या डिफॉल्टमध्ये आता फौजदारी खटला चालणार नाही. 25 लाखांपर्यंत टॅक्स डिफॉल्टर्सवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजूरी घेणे अनिवार्य केले आहे.
निर्यात वाढीसाठी मार्चमध्ये दुबइ्र शॉपिंग फेस्टिव्हलच्या धर्तीवर चार मेगा फेस्टिव्हलचे आयोजन होणार आहे. चार वेगवेगळ्या शहरात ते घेण्यात येईल. 45 लाख रुपयांपर्यंत घर खरेदी केल्यानंतर करांमध्ये सवलत दिल्यामुळे बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल असे सांगून त्या म्हणाल्या परवडणाऱ्या आणि रखडलडल्या मध्यम उत्पन्न गृहप्रकल्पांच्या पुर्ततेसाठी सरकारने 10 हजार कोटींचा निधीचा निर्णय घेतला आहे.
देशातील सर्व बंदरावर मॅन्युअल क्लियरेंस डिसेंबरमध्ये संपेल असे सांगून त्या म्हणाल्या प्राप्तीकरामध्ये ई-असेसमेंट लागू करण्यात येईल. दसऱ्यानंतर ती सुरू होईल. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विमानतळ तसेच बंदरावरील निर्यातीच्या तपासणी लागणारा वेळ कमी करण्यात येईल. जीएसटी आणि आयटीसी रिफंडसाठी लवकरच इलेक्ट्रॉनिक सिस्टिम सुरू करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.