सेऊल: उत्तर कोरियाने आज दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. कोरिया द्विपकल्पामध्ये दक्षिण कोरियाच्या पूर्व किनाऱ्याच्या दिशेने ही दोन क्षेपणास्त्रे डागण्यत आली असे उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यने सांगितले. दक्षिण कोरियाच्या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने वारंवार केलेल्या आवाहनाला धुडकावून उत्तर कोरियाने आपले लष्करी सामर्थ्य वाढवणे सातत्याने सुरूच ठेवले आहे.
यातूनच शांतता प्रस्थापनेसाठी आणि अन्य देशांबरोबरचे संबंध सुधारण्याची त्या देशाची ईच्छा नाही, हे स्पष्ट होते असे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. उत्तर कोरिया आणि अमेरिकेने 12 जून रोजी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनाचे हे उघड उल्लंघन आहे, असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे. पान्मुन्जोम जाहिरनामा आणि सप्टेंबरमधील प्योंगयोंग संयुक्त जाहिरनाम्याने शांतता प्रस्थपनेसाठी शस्त्रबळाचे उघड प्रदर्शन न करणे मान्य करण्यात आले होते.
अमेरिका आणि उत्तर कोरियाने वर्षभरापूर्वी तिखट इशारे दिले होते. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात गेल्यावर्षी सिंगापूरमध्ये ऐतिहासिक शिखर परिषद झाली होती. यावेळी किम यांनी कोरिया द्विपकल्पामधील निःशस्त्रीकरणासाठी मान्यता दिली होती. यानंतर हनोई इथे फेब्रुवारीत झालेली परिषद अपयशी झाली होती.