IPL 2024 (RR vs CSK Match 61) : आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना जिंकताच ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. पण चेन्नईचा प्रवास सोपा नाही. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. राजस्थानने या मोसमात 8 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईने 6 सामने जिंकले आहेत.
तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्ज प्रथम गोलंदाजी करेल.
🚨 Toss 🚨@rajasthanroyals win the toss and elect to bat against @ChennaiIPL
Follow the Match ▶️ https://t.co/1JsX9W2grC#TATAIPL | #CSKvRR pic.twitter.com/gwapMiGSD5
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर चेन्नई आणि राजस्थान 28 सामन्यांमध्ये भिडले आहेत. यापैकी सीएसकेने 15 सामने जिंकले आहेत तर राजस्थानला केवळ 13 सामने जिंकता आले आहेत. चेन्नईची राजस्थानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या 246 धावा आणि सर्वात कमी धावसंख्या 109 धावांची आहे. त्याच वेळी, राजस्थानने CSK विरुद्ध सर्वाधिक 223 धावा केल्या आहेत तर 126 ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे.
हा सामना चेन्नईसाठी करो किंवा मरो असा आहे. खरे तर गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर रुतुराज गायकवाडच्या संघाच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. सध्या CSK 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील.