Ram Gaikwad | Madha Lok Sabha । राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं आहे. तर सध्या अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजकीय पक्षांकडून शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळत आहे.
उमेदवारी अर्ज भरताना पक्षातील मोठमोठे नेते स्वत: उपस्थित राहत आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात उमेदवाराच्या समर्थकांकडून गर्दी केली जात आहे. जेवढी जास्त गर्दी तेवढा विजयाचा विश्वास जास्त असं समीकरणं मानलं जातं. । Ram Gaikwad | Madha Lok Sabha
त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना पक्षांकडून मोठी गर्दी करण्याचा प्रयत्न केला जातो. तर दुसरीकडे काही उमेदवार वेगवेगळ्या क्लुप्त्या करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
असाच काहीसा अनोखा प्रकार माढा मध्ये पाहायला मिळाला आहे. सध्या या उमेदवाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्यांनी सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. मराठा समाजाचे राज्य समन्वयक राम गायकवाड यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना रेड्यावरच बसून एन्ट्री घेतली.
माढा लोकसभेसाठी मराठा समाजाचे राज्य समन्वयक राम गायकवाड हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी राम गायकवाड यांनी यमराजाच्या वेशभूषा केली होती आणि ते रेड्यावर बसून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले.
राम गायकवाड हे मुळचे पंढरपूरचे आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकणारे आरक्षण मिळावे हा मुद्दा घेऊन राम गायकवाड निवडणूक लढवणार आहेत. अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज ते कार्यालयात दाखल झाले होते.
राम गायकवाड काय म्हणाले, पाहा…. Ram Gaikwad | Madha Lok Sabha
“अहो या देशामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, राजकीय पुढाऱ्यांची मग्रुरशाही, हे देवाधिकांना घाबरत नाहीत. ही सगळी लोकं आता फक्त यमाला घाबरणार म्हणून आम्ही यमाच्या अवतारात आलो आहोत.
यम हा शेवटचा टोक असतो. या यमाच्या शेवटच्या टोकावर आम्ही इथे आलो आहोत. आम्ही आज लोकसभेत यमाला घेऊन जाणार आहोत. भ्रष्टाचारी लोकांना संपविण्यासाठीच आम्ही यम म्हणून आलेलो आहोत”, असं स्पष्टीकरण राम गायकवाड यांनी दिलं. । Ram Gaikwad | Madha Lok Sabha