पेशावर – पाकिस्तानच्या सिंध आणि बलचिस्तान प्रांतांच्या सीमावर्ती भागातील एका शहरात भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. (17 pilgrims killed as bus falls in ravine in Pakistan’s Balochistan province)
अपघातात अन्य ३८ जण जखमी झाले आहेत. भाविक बलूचिस्तानच्या खुजदार जिल्ह्यातील सूफी दरगाह शाह नुरानी येथे जात असताना हा अपघात झाला. अपघाताचे ठिकाण कराचीपासून १०० किमी अंतरावर होते.
गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतांमधील बहुतेक जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचे समोर आले आहे.