तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागातील माळेगाव खुर्द येथील वरसुबाई माध्यमिक विद्यालय ही नामांकीत शाळा आहे. येथील विद्यार्थी संस्कार, गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत असल्याचे मत मोहीनी राठी यांनी व्यक्त केले.
ईनर व्हिल क्लब ऑफ़ बाणेर हिल्सच्या हॅप्पी स्कूल उपक्रमांतर्गत वरसुबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव खुर्द या ठिकाणी फ्लोरींग फर्शी, ईमारत रंगकाम, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, इन्सिनरेटर मशीन, टेबल, कपाट, खूर्च्या, ढोल लेझीम, खेळाचे साहित्य, ग्रिनबोर्ड, शेल्फ, लॅपटाँप, फ़ुडप्रोसेंसर इत्यादी भौतिक सुविधा दिल्या आहेत.
क्लबच्या माजी अध्यक्षा बबीता कौशिक आणि विद्यमान अध्यक्षा पौर्णिमा गाजूल यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी बोलताना मोहीनी राठी म्हणाल्या की, हॅप्पी स्कूल प्रोजेक्टमध्ये शंभर शाळांपेक्षा जास्त शाळा सहभागी झाल्या आहेत.
त्याची बुक ऑफ वर्ल्ड रिकार्डसाठी नोंद झाली आहे. स्वागत, प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश गायकवाड, सूत्रसंचालन संतोष बारसकर, आभार डी.व्ही शिंदे, कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र भांड यांनी केले.