DC vs CSK Live Score : दिल्लीने दिलेल्या 192 रन्सच्या आव्हानाचा सामना करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. खलील अहमदने दमदार बॉलिंग करत चेन्नईला पहिल्या तीन ओव्हर्समध्येच दोन मोठे धक्के दिले. ओपनर ऋतुराज गायकवाड (१) आणि रचीन रवींद्र (२) हे लगेच तंबूत परतले.
यानंतर मैदानात आलेल्या अजिंक्य रहाणे आणि डेरील मिचल्सने संयमी खेळी करत टीमचा स्कोअर ५० पार पोहचवला. त्याबदल्यात चेन्नईने दहा ओव्हर्समध्ये दोन विकेट्स गमावत बोर्डावर ७५ रन्स लावले होते. | DC vs CSK Live Score
तत्पूर्वी डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. मथिशा पाथिरानाने तीन विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने ताशी 145 किमीपेक्षा जास्त वेगाने केलेली गोलंदाजी चांगलीच लक्षवेधी ठरली.
पंतला सूर गवसला
मिरॅकल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋषभ पंतने चेन्नईविरुद्ध दमदार कामगिरी केली. त्याने 31 चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. मैदानात परतल्यानंतर त्याचे हे पहिले अर्धशतक आहे, फिफ्टी केल्यानंतर तो लगेच पॅव्हेलियनमध्ये परतला. | DC vs CSK Live Score