शिवजयंती महोत्सव : भरगच्च कार्यक्रम
कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत तथा मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
यावेळी पुणे येथून लाल महल ते डिंग्रजवाडी अशी पायी शिवज्योत आणण्यात आली. यानंतर गावातून पारंपरिक वाद्य संबळ नृत्यावर वाजतगाजत मिरवणूक काढत ज्योतीचे स्वागत करण्यात आले.
समाजप्रबोधनकार हभप संग्राम बाप्पू भंडारे यांचे कीर्तन व व्याख्याते वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने दोन दिवस चाललेल्या भरगच्च कार्यक्रमाने डिंग्रजवाडी परिसर शिवमय झाल्याचे पाहायला मिळाले.