Sujay Vikhe Patil On Nilesh Lanke । दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी रणशिंग फुंकलेल्या निलेश लंकेंनी अखेर काल (दि. ३०) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे जाहीर केलं. पारनेर येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात लंके यांनी राजीनाम्याचे पत्र दाखवलं. तसेच शरद पवार गटाकडून दक्षिण अहमदनगर लोकसभेतून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं.
दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलताना निलेश लंके यांनी भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. दिवा विझताना त्याची वात मोठी होते अशी आपल्या तालुक्यातील परिस्थिती आहे. रावणाच्या अहंकाराचाही नाश झाला होता. तर तुम्ही कोण? अशी टीका त्यांनी सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता केली आहे.
मात्र, आता निलेश लंकेंच्या या टीकेला खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील चांगलाच प्रत्युत्तर दिलं आहे. ‘नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देत आपण लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असल्याचे जाहीर केले आहे’. । Sujay Vikhe Patil On Nilesh Lanke
या संदर्भात आपली प्रतिक्रिया देताना सुजय विखे पाटील यांनी समोरून कोणीही उमेदवार असला तरी मी माझी राणनिती बदलत नसल्याचे म्हटले आहे. मी माझ्या कामाच्या आधारावर जनतेसमोर जाणार आहे. मी कधीही कुणालाही कमी लेखत नाही. मग समोर कोण आहे, त्यावरून माझी राणनीती बदलत नाही’, असे देखील सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे देखील सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. नीलेश लंके यांनी आमच्यावर जे आरोप केले त्यांना मीडियाच्या माध्यमातून आम्ही उत्तर देणार नाही. तर प्रचार सभेच्या माध्यमातून त्याला उत्तर दिले जाईल’, असे देखील सुजय विखे पाटील म्हणाले. । Sujay Vikhe Patil On Nilesh Lanke