Bachhu Kadu Amaravati Loksabha 2024 : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अमरावती लोकसभेच्या जागेसाठी बच्चू कडू आपला उमेदवार उभा करणार आहे. तशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. अमरावती मतदार संघासाठी चांगला उमेदवार मिळाला असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ते मैत्रीपूर्ण संबंध ठेवत महायुतीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघात प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार उभा करू आणि हा उमेदवार 1 लाख मतांच्या फरकाने निवडून येईल, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केल्याने महायुतीतील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. | Bachhu Kadu Amaravati Loksabha 2024
अमरावतीत मैत्रिपूर्ण लढत होईल, असे सांगून तूर्तास आपण महायुतीतच असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये अमरावतीत राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे. | Bachhu Kadu Amaravati Loksabha 2024
प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत. जिल्ह्यात मोठी ताकद आहे. तरीही प्रहारचा विचारही केला जात नाही, ही प्रहारच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे. आमदार रवी राणांकडून धमक्या मिळत आहेत. त्यामुळे आम्ही अमरावतीतून लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला योग्य उमेदवार सापडलेला आहे. तो सक्षम आहे आणि 1 लाख मतांच्या फरकाने तो निवडून येईल. उमेदवाराचे नाव येत्या 6 एप्रिलला जाहीर करण्यात येईल, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. | Bachhu Kadu Amaravati Loksabha 2024