Uddhav Thackeray Shivsena Candidate List| लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्याप महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आज शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, जयंत पाटील, ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि काँग्रेसचे मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु त्याआधी ठाकरे गटाकडून आपल्या उमेदवारांच्या यादीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. Uddhav Thackeray Shivsena Candidate List|
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, उद्या अर्थात 26 मार्च रोजी ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच उद्या शिवसेना ठाकरे गटाकडून 15-16 जागांवरील उमेदवारांची घोषणा करणार असल्याची मोठी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. Uddhav Thackeray Shivsena Candidate List|
हेही वाचा:
“सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते” ; प्रणिती शिंदेचा राम सातपुतेंना उपरोधिक टोला