Arvind Kejriwal Arrest । Sunita Kejriwal । ED News – ईडीच्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा संदेश आज त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. सुनीता यांनी वाचून दाखवलेल्या या संदेशाचीच आज राजधानी दिल्लीत चर्चा होती. या संदेशात केजरीवाल म्हणतात, मी खूप संघर्ष केला आहे, या अटकेचे मला आश्चर्य वाटले नाही.
भारतात आणि भारताबाहेरच्या अनेक शक्ती या देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला त्यांच्यापासून सावध राहावे लागेल. या शक्ती कोणत्या आहेत ते ओळखावे लागेल आणि त्यांना पराभूत करावे लागेल. केजरीवाल आता तुरूंगात आहेत. । Arvind Kejriwal Arrest
आपल्याला दरमहा हजार रूपये मिळतील की नाही असा विचार दिल्लीतील महिला करत असतील. मात्र त्यांनी आपल्या भावावर, आपल्या मुलावर विश्वास ठेवावा असे मी त्यांना आवाहन करतो. कोणतीही जेल मला आत ठेवू शकत नाही. मी लवकरच बाहेर येईल आणि दिलेला शब्द पूर्ण करेन.
दरम्यान, माझ्या अटकेमुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा द्वेष करू नये. ते आपले भाऊ आहेत असेही केजरीवालांनी त्यांच्या समर्थकांना उद्देशून म्हटले आहे. सुनीता केजरीवाल म्हणाल्या की अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे प्रत्येक आश्वासन पूर्ण केले आहे. लोकांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण देशासाठी आहे. । Arvind Kejriwal Arrest