शेवगाव, (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते कोळगे यांना मुंबई येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. कोळगे हे तालुक्यातील आव्हाने बुद्रुक येथील रहिवासी असून, राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्ष ते कार्यरत राहिले आहेत.
आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार संग्राम जगताप , माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र नागवडे, नूतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, माजी जिल्हाध्यक्ष तथा नूतन प्रदेश चिटणीस प्रशांत गायकवाड आदींची उपस्थिती होती.कोळगे माजी आमदार घुले बंधूचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात