Pankaja Munde | भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 72 उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये बीड मध्ये प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. अशात पंकजा मुंडे विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आज दुपारी ३ च्या सुमारास निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. त्या पूर्वी महाविकास आघाडी कडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीडच्या जागेवर मविआकडून राष्ट्रवादी शरद पवार गट दावा करत असल्याचीही माहीत समोर येत आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडेंविरोधात जास्त मत मिळणार उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीने योजना आखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बीडचा उमेदवार ठरविण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. शरद पवार गटाकडून डॉ. नरेंद्र काळे, प्रा. ईश्वर मुंडे, सुशीला मोराळे, रविकांत राठोड हे इच्छूक आहेत. तर डॉ. अशोक थोरात, डॉ. ज्योती विनायकराव मेटे, बजरंग सोनवणे यांच्याही नावाची चर्चा सुरू होती.
अशात आता डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांना शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या समर्थकांनी एक विशेष बैठक घेतली. यावेळी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामधून निवडणूक लढवावी असा निर्णय एकमताने घेण्यात आला.
त्यामुळे आता ज्योती मेटे नेमका काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत भाजपासोबत असलेला शिवसंग्राम पक्ष आता शरद पवार गटात जाणार का? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.
डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या बाबत जाणून घ्या…
शिवसंग्रामचे संस्थापक तथा माजी आ.विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्रामची धुरा कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु आता यावर पडदा पडला असून स्व.मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनीच ही धुरा सांभाळली.
शिवसंग्राम स्थापनेचा मूळ उद्देश मराठा आरक्षण, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तसेच विविध जाती -धर्मातील आरक्षण तथा उपेक्षित असणारे सर्व प्रश्न यासाठी मोठा लढा उभा करून ते भविष्यात सोडवणे.
हे वाचाल का ? टेंशन वाढणार..! श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघावर ‘भाजपची नजर’