लंडन – धार्मिक कट्टरतावाद पसरवणार् या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इंडोनेशिया सारख्या देशांमधील धार्मिक व्याख्यात्यांना ब्रिटनमध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे. या व्याख्यात्यांना रोखण्यासाठीची योजना ब्रिटन सरकारकडून आखली जात असल्याचे ब्रिटनमधील प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.
ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या कट्टरवादी कारवायांची दखल ब्रिटन सरतकारने घेतली आहे. कट्टरवादी विचार पसरवणार् यां परदेशी व्याख्यात्यांचा शोध घेतला जात असून अशा व्याख्यात्यांची नावे व्हिसा रोखण्याच्या यादीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत.
या यादीत नावे टाकली की या व्याख्यात्यांना आपोआपच ब्रिटनमध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे. देशातील लोकशाही आणि बहुधार्मिक मूल्यांना कट्टरवाद्यांकडून धोका निर्माण झाला आहे. ब्रिटनमधील या मूल्यांना पायदळी तुडवणार् यांना प्रवेश रोखला जाईल, असे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अलिकडेच म्हटले होते.
ब्रिटनमध्ये प्रवेश केल्यानंतर जर कोणी द्वेष पसरवणे, आंदोलनाला चिथावणी, धमकावण्याचे उद्योग केले, तर व्हिसा रद्द केला जाईल, असे सुनक म्हणाले होते. इस्रायल-हमासच्या युद्धानिमित्ताने रस्त्यांवर होणार् या आंदोलनांमध्ये कट्टरवाद्यांचा प्रभाव असता कामा नये, असा इशाराही सुनक यांनी दिला होता.
पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ शनिवारी लंडनमध्ये मोठा मोर्चा काढला गेला होता. शांतताभंग केल्याबद्दल पोलिसांनी १२ जणांना अटक केली होती. डाव्या विचारांचे आणि इस्लामी कट्टरवादी विचारांचे गट मिळून अशाप्रकारे पॅलेस्टाईनच्या समर्थनाचे मोर्चे काढत असल्याचे ब्रिटन सरकारचे त्रयस्थ निरीक्षक लॉर्ड वॉल्ने यांनी म्हटले आहे.